08/06/2025

पोफळज जिल्हा परिषद शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न ; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी पोफळजची शाळा- प्रा. गणेश करे-पाटील

0
IMG-20240309-WA0078.jpg

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)-
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी शाळा म्हणजे पोफळज येथील जिल्हा परिषद शाळा असल्याचे मत यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले.

पोफळज येथील जि.प शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी यशकल्याणी संस्थेकडून अकरा हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गणेश करे-पाटील उपस्थित होते तर पोफळजचे सरपंच कल्याण (बापू) पवार, उपसरपंच राणी बिभीषण गव्हाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल धुमाळ यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले.

यावेळी यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील म्हणाले की, पोफळज शाळेचे विद्यार्थी गुणवत्ताधारक असून विविध स्पर्धांमधून सहभागी होत नेत्रदिपक यश मिळवत आहेत. तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा वसंत महोत्सवातील विविध स्पर्धेत या वि‌द्यार्थ्यांनी घेतलेल्या उल्लेखनिय व उत्स्फुर्त सहभागाबद्दल प्रा.करे- पाटील यांनी पोफळज शाळेचे व शिक्षकवृंदांचे अभिनंदन केले.

यावेळी सर्व सहभागी विद्यार्थी कलाकारांना यश कल्याणी संस्थेकडून सहभाग प्रमाणपत्र व शाळेसाठी रोख अकरा हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर केले.

यावेळी व्यासपीठावर सरपंच कल्याण बापू पवार, बिभिषण गव्हाणे, मारूती आप्पा पवार, दत्तात्रय पवार पाटील, पोलीस उपनिरीक्षक सादिक पठाण, सामाजिक कार्यकर्ते अक्षय कुलकर्णी, अध्यक्ष राहुल धुमाळ, इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. लावंड सर करमाळा तालुका इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष पक्षीमित्र प्रा. कल्याणराव साळुंके, अरूण काका पवार, करमाळा तालुका सोसायटीचे संचालक सतिश चिंदे, श्रीकृष्ण भिसे, अनिल कुलकर्णी उपस्थित होते.

या कार्यक्र‌मात कलाकार विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी गीतांसह शेतकरी गीत, कोळीगीत, लावणी, गवळण, आदिवासी गीतांवर नृत्याविष्कार सादर केला. तसेच शिवजयंती उत्सव समिती तर्फे तेरा हजार रूपये किंमतीची साऊंड सिस्टीम शाळेस भेट देण्यात आली. या कार्यक्रमासाठी पोफळज व परिसरातील ग्रामस्थ, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक जहांगीर सय्यद, निलेश जाधवर, पांडुरंग गुटाळ, शुभांगी शिंदे, मुमताज पठाण, रेखा शिंदे-साळुंके, पूजा वाघमारे यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक अंकुश अमृ‌ळे यांनी उपस्थित मान्यवर, शिवजयंती उत्सव समिती व ग्रामस्थांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजमल पाखरे व विवेक पाथ्रुडकर सर यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page