प्रतापराव बरडे यांना राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक व सेवक पतसंस्थेच्या वतीने सन्मान

करमाळा, दि. 9 (करमाळा-LIVE)-
माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रतापराव बरडे यांना राष्ट्रीय पातळीवरील शिक्षक रत्न पुरस्कार मिळलेबद्दल सन्मान करण्यात आला.
संस्थेचे मार्गदर्शक माजी चेअरमन यशवंतराव लावंड यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या चेअरमन मनीषा सपकाळ, रवींद्र सपकाळ, उपाध्यक्ष रशीद पठाण, सचिव पांडुरंग वाघमारे, माजी चेअरमन किरण किरवे, संचालक धनंजय नाळे आदी संचालक उपस्थित होते.

