प्रा.गुरुनाथ मुचंडे ‘यशकल्याणी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानीत

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-
यशकल्याणी सेवाभावी संस्था, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर व सोलापूर जिल्हा इंग्रजी शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण व जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यशकल्याणी सेवाभावी संस्थेतर्फे
निवृत्त प्राध्यापक व शिक्षण तज्ज्ञ करजगी ता.अक्कलकोट येथील रहिवाशी असलेले प्रा.गुरुनाथ मुचंडे यांना शैक्षणिक व सामाजिक व इंग्लिश लँग्वेज टिचर्स असोसिएशनच्या स्थापनेपासून विद्यार्थी विकसनाच्या दृष्टीने राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी दिली.
प्रा.गुरुनाथ मुचंडे यांचे बरोबरच करमाळा येथील ख्यातनाम स्त्री रोगतज्ञ डॉ. वसंतराव पुंडे, कर्नाटकातील पक्षी व पर्यावरण अभ्यासक प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार, पिंपरी चिंचवड (पुणे) नगरपालिकेच्या निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्रीमती शारदाताई लोंढे यांना त्यांच्या प्रशासकीय, वैद्यकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विशेष स्मृतीचिन्ह,मानपत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.
हा समारंभ करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे प्रमुख मार्गदर्शक ख्यातनाम भूलतज्ज्ञ व मिसेस युनिव्हर्स प्रचिती पुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या वेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेशभाऊ करे- पाटील, मातोश्री श्रीमती मालतीताई करे-पाटील , स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ.अक्षय पुंडे, डॉ. कविता कांबळे, करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, सचिव प्रा . धनाजी राऊत, उपाध्यक्ष अगतराव भोसले, उपाध्यक्ष आबासाहेब दाढे, उपाध्यक्ष शशिकांत चंदनशिवे , सुखदेव गिलबिले,किशोर शिंदे, श्रीकांत सावंत, श्रीमंतराजे भोसले, आसिफ तांबोळी , संजय कुचेकर जीवन शिक्षण फाऊंडेशनचे प्रा. जयेश पवार , प्रा. विष्णू शिंदे, अतुल दाभाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
या समारंभासाठी शरद शिंदे, गोपाळ पाटील, सुहास गलांडे ,शंकर दिरगुळे , आबासाहेब कारंडे, विजय राठोड, मोहोळकर , वीटचे प्रा.जाधव आदी पदाधिककाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
या वेळी सोलापूर डिस्ट्रिक्ट इंग्लिश टीचर्स असोसिएशन व मार्फत घेण्यात आलेल्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत विजेतेपद मिळालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आली.
सदर समारंभाला सोलापूर जिल्ह्यातील इंग्रजी शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक प्रा. विष्णू शिंदे यानी केले तर उपस्थितांचे आभार करमाळ।तालुका इंग्लिश टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष कल्याणराव साळुंके यांनी मानले.




