कुंभारगाव चे सुपुत्र पोलीस उपनिरिक्षक विलास धोत्रे यांना विशेष सेवा पदक देऊन सन्मान
करमाळा, दि. 27 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कुंभारगाव चे सुपुत्र आणि सध्या पुणे येथे सायबर क्राईम ब्रँच विभागात पोलीस उप निरिक्षक पदी असलेले विलास अशोक धोत्रे यांचा विशेष पदक देऊन सन्मान करण्यात आला.
विलास धोत्रे यांना गडचिरोली येथे कर्तव्यावर असताना नक्षलदृष्ट आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यात खडतर सेवा केली त्याच बरोबर गुणवत्तापूर्वक व अतिअतिउत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल विशेष सेवा पदक पदक माननीय पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते सीपीआर पुणे येथे वितरित करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे स्तरातून कौतुक होत आहे.