जेऊरच्या अर्णव कुलकर्णी चे पीटीएस (PTS) परीक्षेत यश
जेऊर, दि. 14 (करमाळा-LIVE)-
मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पंढरपूर टॅलेंट सर्च परीक्षेत जेऊरच्या भारत हायस्कूल चा विद्यार्थी अर्णव अनिल कुलकर्णी याने 300 पैकी 244 गुण (81.33 टक्के) मिळविले असून त्याच्या या यशबद्दल पंढरपूर येथे काल जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष अंकुश काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी गटशिक्षाधिकारी मारुती लिगाडे, बाळासाहेब काळे,ज्योतिराम बोंगे, मंदार परिचारक, महादेव आण्णा बागल आदी उपस्थित होते. यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.