पुणे-अमरावती एक्सप्रेस पुन्हा सुरू होणार; जेऊर आणि जिंतीला मिळाला थांबा


जेऊर, दि. 2 (करमाळा-LIVE)-
पुणे-अमरावती एक्सप्रेस गाडी पुन्हा एकदा सुरू झालेली असून करमाळा तालुक्यातील जेऊर आणि जिंती मध्ये ही थांबा असणार आहे. अडीच वर्षांपूर्वी ही गाडी सुरू होती परंतु कोरोनामुळे गाडी बंद झाली होती. अखेर अडीच वर्षांनंतर ही एक्सप्रेस सुरू झालेली असून याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. पुणे-अमरावती ही एक्सप्रेस 16 डिसेंबर पासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार असून 26 फेब्रुवारी पर्यंत ही गाडी सुरू राहील. पुणे-अमरावती ही गाडी शुक्रवार आणि रविवार रोजी धावेल तर अमरवती-पुणे एक्सप्रेस शनिवार आणि सोमवार रोजी धावेल.
वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
गाडी क्रमांक 01439 पुणे-अमरावती-
पुणे- रात्री 10.50 (शुक्रवार आणि रविवार रोजी सुटेल)
दौंड- रात्री 12.07 (दुसरा दिवस)
जिंती रोड- रात्री 12.30
जेऊर- रात्री 1.00 (जेऊर ला शनिवार आणि सोमवार मध्य रात्री येईल)
कुर्डूवाडी- रात्री 1.25
लातूर- सकाळी 6.20 (दुसरा दिवस)
परळी- सकाळी 8.05
अमरवती- संध्याकाळी 5.30
गाडी क्रमांक 01440 अमरवती-पुणे एक्सप्रेस-
अमरवती- रात्री 7.50 (शनिवार आणि सोमवार रोजी सुटेल)
परळी- सकाळी 5.20 (दुसरा दिवस)
लातूर- सकाळी 7.50
कुर्डूवाडी- सकाळी 11.45
जेऊर- दुपारी 12.40 (रविवार आणि मंगळवार रोजी दुपारी येईल)
जिंती- दुपारी 13.40
दौंड- दुपारी 2.50
पुणे- दुपारी 4.20


