गुरूवारी किल्ले पुरंदर येथे होणाऱ्या श्री शंभुराज्याभिषेक सोहळ्यास करमाळ्यातून हजारो कार्यकर्ते जाणार

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)-
गुरूवारी १६ जानेवारीला किल्ले पुरंदर येथे ३४५ वा श्रीशंभुराज्याभिषेक सोहळास करमाळा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत.
यावेळी उपस्थित प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रवीण गायकवाड, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील तसेच सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख उपस्थित राहणार आहेत.
गुरूवारी पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहे-
- सकाळी ०८ वा. गडावर प्रवेश
- सकाळी ०९ वा. स्मारक पूजन
- सकाळी १० वा. पालखी सोहळा
- सकाळी ११ वा. श्रीशंभुराज्याभिषेक
- स. ११:३० वा. पुरस्कार व सन्मान वितरण
- दुपारी १२ वा. मान्यवरांचे मनोगत
- दुपारी ०१ वा. भोजन
- दुपारी ०२ वा. स्वच्छता
अशी माहिती संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष सुहास पोळ तसेच संभाजी ब्रिगेड जेऊर शहर अध्यक्ष अतुल निर्मळ यांनी माहिती दिली आहे.