पुणे, दि. २८ (करमाळा-LIVE)-
हडपसर येथे राजनंदनी स्मृती फाउंडेशनने वारकऱ्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.
राजनंदनी स्मृती फाउंडेशनच्या वतीने आळंदीवरून दिवे घाट मार्गे आषाढी वारी निमित्त पंढरपूर कडे जाणाऱ्या पालख्यांना हडपसर परिसरामध्ये आल्यानंतर पर्यावरणाचा संदेश देऊन वारकऱ्यांना सीड बाॅल चे वितरण करण्यात आले.
सर्व पुणेकर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत करण्यासाठी सज्जा असतात त्याचबरोबर इतरही पालख्या दिवेघाट मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान होतात. आज राजनंदनी स्मृती फाऊंडेशनच्या वतीने पालखी दिंडी मधील वारकऱ्यांशी हितगुज साधून त्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून सीड बोॅल बिया देण्यात आल्या.
कडुलिंब, जांभूळ, सिताफळ, अशोका, आंबा, चिंच आदी बियांचे पाऊच करून ते वारकऱ्यांना देण्यात आले. यावेळी वारकऱ्यांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पृथ्वीची धूप थांबवण्यासाठी पर्यावरण रक्षण होणे महत्त्वाचे आहे यासाठी वृक्षतोड थांबली पाहिजे तसेच वृक्ष लागवड झाली पाहिजे तसेच प्लास्टिक मुक्त परिसर व्हावा हा संदेश वारकऱ्यांना देण्यात आला संस्थेचा गेली तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू असून अडीच लाख बिया वितरित करण्यात आल्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पर्यावरण रक्षणाची मोहीम हाती घेतली असून इको फ्रेंडली गणेशा या माध्यमातून पन्नास हजार स्पर्धकांना प्रमाणपत्र ही देण्यात आलेले आहेत.
तसेच प्लास्टिक मुक्त परिसर या संकल्पनेतून परिसराची स्वच्छता ही हाती घेण्यात आलेली आहे पुढील काळामध्ये ही संस्थेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे माहिती अध्यक्ष नारायणसिंग चंदेल व सचिव संतोषसिंह ठाकूर यांनी दिली.
या उपक्रमामध्ये अध्यक्ष नारायणसिंग चंदेल, सचिव संतोष सिंह ठाकूर, सहसचिव नरेंद्रसिंह ठाकूर, कलशेट्टी, अश्विनी जाधव, सुरेखा पवार, शिवकन्या काळे, गणेश वाकोरे, सुदीप दिंडे, द्वारकाधीश डिस्ट्रीब्यूटर इत्यादींनी परिश्रम घेतले.