राजुरी येथील गणेश मोरे यांना
‘राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान


करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-
राष्ट्रभक्ती जनविकास संघटना आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करमाळा तालुक्यातील राजुरी येथील गणेश मोरे यांना मराठी चित्रपटाचा उत्कृष्ट अभिनेता आणि शॉर्ट फिल्म क्षेत्र या मानाचा त्यांना ‘राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
सदरील पुरस्कार सोहळा काल रविवारी 12 फेब्रुवारीला पुण्यातील टिळक रोड येथे पार पडला. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, लातूरच्या विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती मेटे, पद्मश्री सरपंच डॉ. पोपटराव पवार, महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य डॉ. अविनाश साकुंडे, सामर्थ जनशक्ती संघटना अध्यक्ष जगन्नाथ माने, पुरातत्व विभागाचे डॉ. विलास वाहणे व सुनिल गोरे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडला.
गणेश मोरे यांनी फार्मसी चे शिक्षण घेत असताना समाजसेवा विषयावर मराठी चित्रपट, शॉर्ट फिल्म मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवला आहे. या अगोदर त्यांना 13 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.
