दैनंदिन किराणा माल बाजार-भाव यादी मिळतेय सोशल मिडीयावर; ग्राहकांना होतोय फायदा- फसवणूकीचे प्रमाण होत आहेत कमी.!
करमाळा, दि. 27 (करमाळा-LIVE)-
करमाळ्यातील दत्त पेठेतील रितेश किराणा अँड जनरल स्टोअर्स चे मालक व व्यापारी संघटनेचे सर्वेसर्वा रितेश कटारिया यांच्या वतीने दररोज मालाच्या भावाची यादी प्रसिद्ध केली जाते यामुळे याचा फायदा ग्राहकांना होत आहे.
अशाप्रकारची सेवा देणारे तालुक्यातील एकमेव किराणा दुकान असून तालुकाभर या यादीची व दुकानाची चर्चा एकावयास मिळत आहे. रितेश कटारिया यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आज तेलाचे भाव, धाण्यांचे भाव रोजच्या रोज बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी मी दररोज ही यादी सकाळी लवकरात लवकर सर्व ग्रुपवर्ती सोडत असतो. त्यामुळे बरेचसे ग्राहक ही यादी पाहून माल खरेदी करतात. ग्राहकांची पसंती, ग्राहक खूष तर आम्ही व्यापारी खुश अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या ग्राहक सेवेमुळे लोकांचा खरेदीचा कल वाढला असून ग्राहकांचा आनंद हाच आमचा प्रसाद या प्रमाणे आम्ही सेवा देत आहोत व भविष्यात देखील देणार आहोत असेही त्यांनी सांगितले.