“रासप” करमाळा विधानसभा स्वबळावर लढवणार ; लवकरच उमेदवार जाहीर होणार

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)-
राष्ट्रीय समाज पक्षाची करमाळा येथे बैठक संपन्न झाली.
या बैठकीचे अध्यक्ष म्हणून पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख तानाजी शिंगाडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा करमाळा विधानसभा निरीक्षक विकास आलदर, पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, सोलापूर जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते हे होते. यावेळी तालुका अध्यक्ष जिवन होगले, तालुका प्रभारी नामदेव पालवे, अल्प सं.आघाडी तालुका अध्यक्ष जहांगिर पठाण, रासपा तालुका उपाध्यक्ष विठ्ठल भिसे, प्रविण होगले, सुधीर ठोंबरे, शलैश शिंदे, तात्या वायसे,भाऊ हाके, विकास मेरगळ, दिपक कडू, बंन्डू कुराडे, रघुवीर आडसुळ यांच्या प्रामुख उपस्थितीत के, हाईट्स करमाळा येथे बैठक पार पडली.
या आयोजित बैठकी वेळी पक्ष निरीक्षक विकास आलदर, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख तानाजी शिंगाडे, किरण गोफणे यांनी रासप स्वबळावर करमाळा विधानसभा लढवणार असल्याचे बैठकीत नमूद केले.
या प्रसंगी विधानसभा निरीक्षक विकास आलदर म्हणाले की, करमाळा विधानसभा निवडणुक रासप पूर्ण ताकदीनिशी लढवणार असून सर्व रासप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागायला हवे. गावा-गावात, मतदारापर्यंत पोहोचून गाव बैठकीच्या नियोजना द्वारे बुथ,गणांची बांधणी, दूबार, मयत मतदारांची यादी पडताळणी करून गाव तेथे कार्यकर्ता जोडायला हवा.पक्षाचे जानकर साहेबांचे विचार तळागाळापर्यंत समजून सांगावेत. राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब हे वंचित, शेतकरी, कष्टकरी घटकातील सर्व सामाजाला सामावून घेणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे. राष्ट्रीय समाज पक्षा हा वंचित घटकांतील सर्व जाती-जमातीला सामाविष्ट करून सामान्य कार्यकर्त्याला नेता बनवणारा पक्ष आहे.पक्षाचे इतर चार राज्यात चांगले आहे. सध्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या सर्व विधानसभा आपण स्वबळावर लढवणार आहोत.
करमाळा तालुक्यातील इतर प्रमुख नेत्यांची दिशा भरकटलेली असल्याने समाजात असंतोष आहे त्यामुळे तालुक्याचे फार मोठे नुकसान होत आहे. या प्रस्थापितांना रोखण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा विधानसभेसाठी योग्य पर्याय कसा ठरू शकतो हे लोकांनपर्यंत जाऊन पटवून सांगायला हवे. राष्ट्रीय समाज पक्षात माढा-करमाळा तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार जानकर साहेबांना भेटत आहेत. मला सुद्धा करमाळा विधानसभा लढवण्याचे संकेत राष्ट्रनायक महादेव जानकर यांनी दिले आहेत. तोच आदेश पाळून मी करमाळा विधानसभा लढवणार असल्याचे सुतोवाच पक्ष निरीक्षक तथा जिल्हा अध्यक्ष विकास आलदर यांनी उपस्थितीत पदाधिकारी बैठकी दरम्यान नमूद केले.