राष्ट्रीय चित्रकार संदेश खुळे यांच्या चित्र कलाकृत्याचे आजपासून मुंबईत प्रदर्शन

करमाळा, दि. 17 (करमाळा-LIVE)-
करमाळ्याचे सुपुत्र आणि राष्ट्रीय चित्रकार संदेश खुळे यांच्या चित्र कलाकृत्याचे प्रदर्शन मुंबई येथे संपन्न होणार आहे.
दिनांक 17 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन खुले असून जहांगीर आर्ट गॅलरी, एमजी रोड, मुंबई येथे सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये पाहण्यास खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेक पियुष पल्हाडे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास फाउंडर रूम ऑफ आर्ट चे राजुल शहा, फाउडर आर्ट झोेलो आर्ट गॅलरीचे विशाल सिंगहल ऐरावत आर्ट गॅलरीचे फाउंडर जयंत पटेल आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
