शेलगावंच्या शाश्वत सुतार चे एटीएस (ATS) परीक्षेत यश

जेऊर, दि. 27 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील शेलगावं (वां) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी शाश्वत श्रीकांत सुतार (इयत्ता पहिली) याने एटीएस (ATS) प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळविले असून त्याचा राज्यात बारावा, जिल्ह्यात नववा तर केंद्रात पहिला क्रमांक आला आहे.
शाश्वतला शिक्षक तात्यासाहेब जगताप यांचे मार्गदर्शन लाभले, शेलगावं परिसरात त्याचे कौतुक होत आहे.

