शेटफळच्या जिव्हाळा ग्रुपची सामाजिक बांधिलकी आजही सुरू ; गावातील गरजूनां दररोज देणार जेवण- उपक्रमाचा शुभारंभ
चिखलठाण, दि. 16 (करमाळा-LIVE)-
शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने दिपावली निमित्त किल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण गावातील गरजूना दररोज जेवण डब्बे पुरविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ व गावातील गुणवंतांचा सन्मान कार्यक्रम संपन्न झाला.
तहसीलदार विजय जाधव व ग्रामसधार समीतीचे अध्यक्ष ॲंड डॉ बाबूराव हिरडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात किल्ले बांधणी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. गावातील निराधार गरजंना दिपावली फराळ डब्बा देत दररोज जेवणाचा डब्बा पोहच करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तर गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना तहसीलदार जाधव म्हणाले की, माणुसकी हरवत चाललेल्या युगात सामाजिक बांधिलकी जपत शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुपचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक असून जिव्हाळा ग्रुपचे वर्षभर विविध उपक्रम सुरू असतात वाचनालय अभ्यासिकेसारखा उपक्रम लोकउपयोगी आहे. अशा सर्व उपक्रमांना आमचे नेहमी सहकार्य राहील. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड डॉ हिरडे म्हणाले की, शेटफळ गावाने सामाजिक, धार्मिक, कृषी व सांस्कृतिक क्षेत्रात शेटफळ या गावाने जो आदर्श निर्माण केला आहे तो इतरांसाठी अनुकरणीय आहे. यामध्ये जिव्हाळा ग्रुपचे योगदान महत्त्वाचे आहे.
शेतकरी गटापासून ते लोकविकास फार्मर्स प्रोडूसर कंपनीपर्यंत सामाजिक, धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे कार्य आहे. एका गावामध्ये व्यसनमुक्तीचे काम एका गावामध्ये ग्राहक पंचायतचे काम, एका गावामध्ये सामाजिक क्षेत्रातील काम आणि एका गावामध्ये सांप्रदायिक क्षेत्रातील काम याचबरोबर सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जी वाटचाल केली जात आहे आणि त्यांच्या उन्नतीसाठी जे उपक्रम राबवले जातात. हे उपक्रम निश्चितच इतरांसाठी आदर्शात्मक आहे आणि हा आदर्श इतरांनी घेण्याची नितांत गरज आहे असेही मत व्यक्त केले.
या गावातील संप्रदायाचे प्रमुख ह.भ.प विठ्ठल महाराज पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये युवकांचे जे कार्य आहे ते निश्चितच प्रकारे आम्हाला सर्वांना आदर्शात्मक अशा पद्धतीचे आहे. या कामातून गावातील युवक हे निश्चितच प्रकारे गावचे तर भूषण आहेतच परंतु तालुक्यात, राज्यात नव्हे तर देशांमध्ये सुद्धा या गावाचं नाव उज्वल करण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न करतील व त्यांनी ते प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
यावेळी बाल व्याख्याता संध्याराणी लबडे हीचे व्याख्यान झाले तसेच पुजा लबडे, दिपाली चिंचकर, पोलीस उपनिरीक्षक अमित लबडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन धेंडे यांनी केले तर आभार पोलीस हवलदार नवनाथ नाईकनवरे यांनी मानले तर सूत्रसंचालन पत्रकार गजेंद्र पोळ यांनी केले. गावातील माजी सरपंच मुरलीधर पोळ तसेच वैभव पोळ, साहेबराव पोळ, सुभाषराव लबडे, विजय लबडे, सचिन निंबाळकर, अशोक लबडे, कैलास अण्णा लबडे, श्रीराम गुंड, विलास आप्पा लबडे, संतोष घोगरे, महावीर निंबाळकर, महेश नाईकनवरे, प्रशांत नाईकनवरे, नानासाहेब साळुंके, सागर पोळ, विष्णू पोळ आदी उपस्थित होते
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”