08/06/2025

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेटफळचा अमित लबडे पोलीस उपनिरीक्षक

0
IMG_20230705_081222.jpg

चिखलठाण, दि. 5 (करमाळा-LIVE)-
प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय झाल्याने संपूर्ण गावाने केला आनंदोत्सव साजरा केला.

शेटफळ येथील अमित गौतम लबडे याची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. अमितचे प्राथमिक सातवी पर्यंतचे शिक्षण शेटफळ गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले त्यानंतर माध्यमिक शिक्षण जेऊर येथील भारत हायस्कूल या ठिकाणी होऊन त्याने शास्त्र शाखेत पदवीचे शिक्षण घेतले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्याने या पदापर्यंत मजल मारली आहे. वडील अल्पभूधारक शेतकरी शाळा शिकत असताना सुद्धा वेळ मिळेल तेंव्हा वडिलांना मदत करत त्याने आपला अभ्यास केला.

आज दुपारी आईवडील शेतात काम करत असताना आपला मुलगा पी.एस.आय परिक्षेत पास झाल्याची माहिती मिळताच आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page