06/01/2025

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जपावी- ह.भ.प विठ्ठल महाराज

0
IMG-20231005-WA0048.jpg

चिखलठाण, दि. 5 (करमाळा-LIVE)-
वैद्यकीय शिक्षणातील यशानंतर विद्यार्थ्यांनी आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकीची जपत आपल्या जीवनातील पुढील वाटचाल करावी असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प विठ्ठल पाटील महाराज यांनी शेटफळ येथे प्रतिकूल परिस्थितीतून बीएचएमएस पदवी उत्तीर्ण झालेल्या सिद्धार्थ राजेंद्र पोळ यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पांडुरंग लबडे होते. पुढे बोलताना महाराज म्हणाले की, सध्याचे शिक्षण हे सामान्यांसाठी मोठे दिव्य असले तरी अनेक सामान्य कुटुंबातील मुलं कष्ट जिद्द चिकाटीच्या जोरावर यश खेचून आणत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे सिद्धार्थ याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवण्यात यश मिळालेले आहे त्यांनी या यशावर न थांबता या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेऊन आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत सामाजिक बांधिलकी जपत आपला व्यवसाय करावा असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिव्हाळा ग्रुपचे गजेंद्र पोळ यांनी केले यावेळी कन्हैया पाटील प्रशांत नाईकनवरे यांची भाषणे झाली.

सत्काराला उत्तर देताना सिद्धार्थ पोळ यांनी आपल्या खरतर वाटचालीविषयी माहिती देत सामाजिक बांधिलकी जपत पुढची वाटचाल निश्चित राहील असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला उपसरपंच शिवाजी पोळ, पंढरपूर येथील महादेव नाईकनवरे-पाटील, मकाईचे माजी संचालक किरण पोळ, सुरेश पोळ,अशोक घोगरे, मुरलीधर पोळ, विकास गुंड, राजाभाऊ रोंगे, प्रमोद मोरे, सुहास पोळ, शंकर पोळ, सचिन पोळ, आनंद नाईकनवरे, महेश सातपुते, सुरज सुर्वे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page