शेटफळच्या सरपंचपदी छाया गुंड यांची बिनविरोध निवड

चिखलठाण, दि. २२ (करमाळा-LIVE)-
शेटफळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदी छाया गोरख गुंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शेटफळ येथील ग्रामपंचायतचे सरपंच पांडुरंग लबडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात निवड कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.
यावेळी सरपंच पदासाठी छाया गोरख गुंड यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी जेऊर मंडलचे मंडलाधिकारी अनिल ठाकर यांनी त्यांची निवड घोषित केली. नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण असून सत्ताधारी गटातील सदस्यांच्या अंतर्गत तडजोडीनुसार ग्रामपंचायत निवडणूकीनंतर प्रथम विकास गुंड यांची सरपंच पदी निवड करण्यात आली होती.
त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर पांडुरंग लबडे यांनी सरपंच म्हणून काम पाहिले श्री लबडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर सर्व सहमतीने छाया गुंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर गावात गुलाल उधळीत फटाक्याची आतिषबाजी करत त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले करण्यात आली. या निवडीच्यावेळी बाजार समितीचे माजी संचालक दादासाहेब लबडे, माजी सरपंच विकास गुंड, पांडुरंग लबडे, काकासाहेब गुंड, उपसरपंच विजया पोळ, ग्रामपंचायत सदस्य अन्नपूर्णा नाईकनवरे, आजिनाथ कळसाईत, शिवाजी पोळ, आनंद नाईकनवरे, भाऊसाहेब साबळे, बापूराव गुंड, विठ्ठल गुंड, भाऊसाहेब गुंड, सोमनाथ गुंड, बाबुराव चोरगे, सुहास पोळ, सचिन पोळ, शहाजी पाटील, भारत पाटील, ग्रामसेवक सचिन सरडे, तलाठी ईश्वर कदम तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.