शेटफळ येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
चिखलठाण, दि. 2 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलवडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शेटफळचे सरपंच विकास गुंड, उपसरपंच आनंद नाईकनवरे, केंद्र प्रमुख वंदना पांडव यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहूणे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर शालेय विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शानाचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये विद्यार्थ्यांनी गौळण, गौंधळी नृत्य, कोळी गीत, शेतकरी गीत, देशभक्ती गीत, आराधी गीत, जुन्या नविन चित्रपट गीतांचा समावेश होता.
छोट्या विद्यार्थ्यांनी केलेल्या नृत्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त व बक्षीसाने दाद मिळली. यामधून शाळेला पन्नास हजार रूपयांची मदत झाली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकिशोर वलटे यांनी केले तर आभार दगडे यांनी मानले. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन पोळ, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पोळ, पांडुरंग लबडे, विठ्ठल गुंड संभाजी ब्रिगेडचे सुहास पोळ, शंकर पोळ, अमोल घोगरे, प्रशांत नाईकनवरे, गजेंद्र पोळ, वैभव पोळ, धनाजी गायकवाड, अशोक पोळ, अमोल पोळ, राजेंद्र साबळे मुख्याध्यापक किसन बोटे, दगडे सर, शिवाजी शिंदे सर्व शिक्षकांच्यासह गावातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.