25/03/2026

पोफळजच्या शिवराज पवारची नवोदय साठी निवड

0
image_editor_output_image524277376-1774431640769.jpg

जेऊर, दि. २५ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील पोफळज जिल्हा परिषद शाळेच्या शिवराज अखिल पवार याची पोखरापूर येथील जवाहर नवोदय साठी निवड झाली आहे.

शिवराज हा इयत्ता पाचवी मध्ये शिकत असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने यश संपादन केले आहे. त्याला शाळेचे दुरंदे सर तसेच शाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल मारुती पवार, बाबासाहेब पवार, दत्तात्रय पवार, तानाजी पवार, हनुमंत पवार, रोहित पवार, प्रदीप सरडे यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page