श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या प्रत्येक निवडणुकीत नवा चेअरमन- आगामी निवडणुकीत ही परंपरा कायम राहणार?
करमाळा, दि. 19 (करमाळा-LIVE)-
एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस गाळप करणारा कारखाना म्हणून श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे नाव होते. कालांतराने आदिनाथ कारखान्याची अधोगाती सुरू झाली, अन् तीन वर्ष बंद असलेला कारखाना कसाबसा सुरू झाला. श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या प्रत्येक निवडणुकीत नवा चेअरमन आजवर पहायला मिळाला आहे. आगामी निवडणुकीत ही परंपरा कायम राहणार का याकडे लक्ष लागले आहे.
आदिनाथ कारखान्याचा इतिहास पाहिला तर 1971 साली कारखान्याचा भूमी पुजन झाले होते आणि तब्बल वीस वर्षांनी पहिला गळीत हंगाम 1992 साली पार पडला आज पर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त सत्ता राखण्यात बागल गटाला यश मिळाले आहे तर पाटील-जगताप गटाला एकदा सत्ता मिळविण्यात यश मिळालेले आहे. बागल गटातून आतापर्यंत माजी मंत्री कै. दिगंबर बागल, गिरधरदास देवी, वामनराव बदे कै रावसाहेब पाटील, प्रदिपकुमार जाधव-पाटील, तात्यासाहेब मस्कर आणि श्मामल बागल, संतोष पाटील आणि धनंजय डोंगरे यांनी चेअरमन पद भूषविले आहे तर पाटील-जगताप गटातून माजी आमदार जयवंतराव जगताप आणि कै गोविंदबापू पाटील यांनी चेअरमन पदाची धूरा संभाळली आहे.
आदिनाथ कारखान्याचे चेअरमन पुढीलप्रमाणे-
1) सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील- 23-7-1971 ते 11-8-1971
2) दादासाहेब रणदिवे- 12-8-1971 ते 5-8-1975
3) गुरुलिंग जाधव- 6-8-1975 ते 11-6-1984
4) गोविंदबापू पाटील- 12-6-1984 ते 29-7-1990
5) गोविंदबापू पाटील (प्रशासक)- 30-8-1990 ते 7-9-1990
6) अरविंद कांबळे (प्रशासक)- 1-10-1990 ते 31-1-1991
7) गिरधरदास देवी- 21-2-1991 ते 25-11-1992
8) रावसाहेब पाटील- 6-1-1993 ते 20-3-1995
9) प्रदिपकुमार जाधव-पाटील- 21-3-1995 ते 22-9-1996
10) गिरधरदास देवी- 23-9-1996 ते 15-7-1998
11) वामनराव बदे- 7-9-1998 ते 30-10-2001
12) रावसाहेब पाटील- 31-10-2001 ते 27-5-2003
13) गोविंदबापू पाटील- 28-5-2003 ते 24-4-2005
14) जयवंतराव जगताप- 11-5-2005 ते 5-11-2006
15) तात्यासाहेब मस्कर- 6-11-2006 ते 8-3-2012
16) श्यामल ताई बागल- 9-3-2012 ते 13-6-2017
17) संतोष पाटील- 14-6-2017 ते 13-6-2019
18) धनंजय डोंगरे- 14-6-2019 ते आजपर्यंत