संजिवनी पॅनलची शेलगावं तसेच वांगी-२ येथे प्रचारसभा ; आमदार नारायण आबा पाटील यांना सभासदांचा भरघोस पाठिंबा

करमाळा, दि. ९ (करमाळा-LIVE)-
विधानसभा निवडणुकीनंतर आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत सुध्दा करमाळा तालुका माझ्या पाठीशी असल्याचा ठाम विश्वास आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवला.
वांगी २ येथील सभेत ते बोलत होते, सभेच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक बापूराव देशमुख होते तर यावेळी व्यासपीठावर बाजार समिती संचालक बापुराव रणसिंग, माजी सभापती अतुल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, उपसभापती गणेश चौधरी, कदम रावसाहेब, महादेव चौधरी, जोतीराम नरूटे, दत्तात्रयआण्णा रणसिंग, गणेश जाधव,सुरेश जाधव, सतिश चौधरी, विशाल तकीक, बप्पा महाडिक, काकासाहेब जाधव, बशीर पटेल, औदुंबर सातव, वैभव पाटील, आप्पासाहेब सातव, नामदेव सपकाळ, बाळू महाडिक, बाळासाहेब चौधरी, महादेव तकीक, बापूराव खराडे, गोरख देशमुख, राहूल जाधव, विष्णू महाडिक, काकासाहेब भानवसे, नामदेव महाडीक, विजय ढावरे, मधूकर जाधव, दादा माने आदी उपस्थित होते.
तर शेलगाव (वांगी) येथील सभेस कार्यक्रमाचे अध्यक्ष काकासाहेब पाटील, अतुल पाटील, शेखर गाडे, कदम रावसाहेब, माजी जि प सदस्य चंद्रप्रकाश दराडे, नवनाथआबा केकाण, सोसायटी चेअरमन – रघुनाथ केकाण, दत्तात्रय केकाण, वसंत केकाण, ठोकळ सर, भारत पोटे, समाधान जाधव, किरण साळुंके, प्रविण घोगरे, विठ्ठल केकाण, ब्रम्हदेव जाधव, नामदेव दराडे, चंद्रकांत केकाण, बाळासाहेब बेरे, दत्तात्रय यादव, विजयकुमार जाधव, प्रविण पोळ, बंकट कदम,धनंजय कारे
प्रविण केकाण, युवराज टकले, गोविंद ठोंबरे, देविदास केकान, नागनाथ केकण, संतोष केकाण आदी उपस्थित होते.
यावेळी केकान महाराज, उमेदवार दादासाहेब पाटील, माजी सभापती अतुल पाटील, महेंद्र पाटील, बापुराव देशमुख आदिंची भाषणे झाली. या सभांना केम गटातील दत्ताबापू देशमुख, राधिका तळेकर, विजय नवले, दादासो पाटील, महेंद्र पाटील हे उमेदवार उपस्थित होते.
प्रास्ताविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार सरपंच अमर ठोंबरे यांनी मानले. दोन्ही सभांना मोठ्या संख्येने सभासद मतदार उपस्थित होते.