श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन- गणेश चिवटे


करमाळा, दि. 17 (करमाळा-LIVE)-
सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने “सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे” ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी 6:15 मि.गोजर मुहूर्तावर आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश चिवटे यांनी दिली आहे.
श्रीराम प्रतिष्ठानच्या चार फेब्रुवारी रोजी असणाऱ्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने नियोजनात्मक बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते, पुढे बोलताना ते म्हणाले की, गत वर्षी श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 21 जोडप्यांचे विवाह संपन्न झाले होते. यामध्ये वधू -वरांना व वऱ्हाडी मंडळींना सर्व आवश्यक त्या उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यासाठी करमाळा शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या मनाने सहकार्य केले होते. त्यामुळे हा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्सवात व आनंदाने पार पडला, या अनुषंगाने या वर्षीही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षीच्या दुष्काळी परिस्थिती मध्ये या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन महत्वपूर्ण ठरणार आहे. तरी करमाळा तालुक्यातील व परिसरातील इच्छुक नागरिकांनी श्रीराम प्रतिष्ठान, किंवा भाजपा संपर्क कार्यालय गायकवाड चौक करमाळा येथे संपर्क साधावा असे आवाहन गणेश चिवटे व श्रीराम प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केले आहे. या बैठकीसाठी श्रीराम प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

- दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण
- करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’
- ३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन
- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर

