सोलापूर-अजमेर एक्सप्रेसला जेऊर येथे थांबा द्या ; विविध संघटनांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)-
सर्व हिंदू-मुस्लीम धर्माचे श्रद्धास्थान असणारे हजरत ख्वाजा गरीब नवाज अजमेर शरीफ यांच्या दि. ०७ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या ऊरूसानिमित्त सोलापूर येथून जाणारी गाडी क्र-०९६२७ व ०९६२८ सोलापूर-अजमेर एक्सप्रेस गाडीला जेऊर येथे कायमस्वरूपी थांबा देण्यात यावा. या मागणीचे निवेदन आमदार नारायण पाटील, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, शहिद भगतसिंग प्रवासी संघटना करमाळा तालुका, संभाजी ब्रिगेड, किरकोळ व्यापारी कल्याणकारी संस्था, महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा, सकल मुस्लिम समाज जेऊर यांच्या वतीने आज दि.२१ डिसेंबरला जेऊर रेल्वे स्टेशन येथे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी निवेदन देताना पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, शहिद भगतसिंग प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण करे, किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पवन कोठारी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रदीप पवार, जेऊर गावचे आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामीण भागातील ग्रामस्थ तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते.