कुंभेजच्या बागल विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश ; ९७.९५% निकाल
करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-
मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत कुंभेज येथील दिगंबरराव बागल विद्यालयाचा एकूण निकाल ९७.९५ टक्के लागला असून प्रथम तीन गुणवंतांमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे.तृप्ती भारत सातव ९१.६०% घेऊन प्रथम आली असून, पल्लवी कुमार कादगे ८८.२०% घेऊन द्वितीय तर समृध्दी सोमनाथ शिंदे ८३.६०% तिसरा क्रमांक आला आहे.
विद्यालयातील ४९ पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून त्यामध्ये १७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे तर १६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली तर १४ विद्यार्थी द्बितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.
बागल विद्यालयाने महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत बागल विद्यालयाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.
सहशालेय विविध उपक्रमांत ऊत्तुंग यश मिळवत असताना गुणवत्तेतही विद्यालयाने यशाची परंपरा अखंडीत ठेवली आहे.
बागल विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल संस्थाध्यक्षा तथा माजी आमदार शामलताई बागल, संस्थेच्या सचिव रश्मी बागल, युवानेते दिग्विजय बागल मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांनी अभिनंदन केले आहे.