कुंभेज येथील सुशिला भोसले यांचे निधन
जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)-
कुंभेज येथील रहिवासी आणि सध्या इंदापूर येथे स्थित असलेल्या सुशिला साहेबराव भोसले (वय ८५) यांचे काल वृद्धपकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवांडे असा परिवार आहे. इंदापूर येथील क्रिटीकेअर चे सदस्य गोरख भोसले यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांच्यावर इंदापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक ग्रामस्थ, पाहुणे मंडळी, संप्रदायातील भजनी मंडळी, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मित्र मंडळी तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे व सोनाई परिवाराचे प्रमुख माने दादा हे उपस्थित होते.