आदर्श शिक्षिका उज्वला नायकुडे-कुटे उर्फ बाई मावशी

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)-
आदर्श शिक्षिका उज्वला नायकुडे-कुटे उर्फ बाई मावशी सेवानिवृत्त होत आहेत. खरंच वाटत नाही की ती सेवानिवृत्त होईल, कारण बाई मावशीचा पिंडच सदैव काम करण्याचा असल्याने शिक्षकी पेशातून जरी ती सेवानिवृत्त होत असले तरी आपल्या कौटुंबिक, सामाजिक धार्मिक, जबाबदारीत पुढील आयुष्यामध्ये कुटुंबाच्या कल्याणासाठी ती काम करत राहणार आहे.
बाई मावशी म्हणजे उज्वला राजेंद्र नायकुडे-कुटे ही आमची धाकटी मावशी तिचा जन्म जरी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला असल्या तरी पहिल्यापासून तिचा स्वभाव जिद्दी होता. घरची परिस्थिती सर्वसाधारण होती कारण वडील बाबुराव कुटे एसटीमध्ये कंडक्टर यामध्ये या चौघी बहिणी तिघे भाऊ आई गृहिणी असे मोठे कुटुंब असतानाही शिक्षणासाठी तिचा ओढा पहिल्यापासूनच कायम होता आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजे याकरता तिने जिद्दीने चिकाटीने शालेय व महाविद्यालयीन बारावीपर्यंत शिक्षण घेतले बारावी मध्ये चांगले मार्क मिळून तिने डीएड करण्याचा निर्णय घेतला. आई-वडील भावांचे मार्गदर्शन तिला लाभले. मुळात तिचा स्वभाव हा जिद्दी असल्याने तिने डीएड परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन ती शिक्षिका बनली शिक्षक झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील पांडे येथे तिने नोकरीची सुरुवात केली नोकरी करत असतानाचा तीन-चार वर्षांनीच तिचा विवाह बावडा अकलूज येथील रहिवासी पुणे येथे कंपनीमध्ये इंजिनियर उच्च अधिकारी असलेले राजेंद्र नायकुडे यांच्याबरोबर झाला लग्नानंतर तिने पुणे येथे बदली करून घेतली व जिल्हा परिषद शाळा नेरे (ता.मुळशी) पुणे येथे ती शिक्षणाचे कार्य यशस्वीपणे करू लागली संसारिक जीवनामध्येही तिने आपले जबाबदारी यशस्वीपणे पार पडली.
निखिल, अनिकेत ही दोन मुले असून दोघेही विवाहित आहेत. दोन्ही मुलांना चांगल्या संस्कार दिल्यामुळे निखिल हा कंपनीमध्ये उच्च पदावर काम करत आहे तर अनिकेतही कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत आहे. आरती आणि कावेरी या दोन्ही सुना उच्चशिक्षित आहे. बाई मावशीला दोन नातू व एक नात अध्यात्माची तिला विशेष आवड असून स्वामी समर्थ महाराज यांच्या वरती ची तिची नितांत श्रद्धा आहे.
कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून नाते संबंधांमध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना मदत सहकार्य करण्यासाठी बाई मावशी सदैव अग्रेसर असल्याने सत्कर्माच्या जोरावर ती सुखी आनंदी जीवन जगत आहे. कर्माचा सिद्धांतच आहे की तुम्ही लोकांचे चांगले केले तर त्याचे फळ तुम्हाला चांगलेच मिळते जीवनामध्ये सुद्धा आपण आपल्या कुटुंबाबरोबर समाज नातेसंबंध यांच्या हिताचा विचार करून त्यांच्या कल्याणासाठी चांगले काम केले तर निश्चितच आपले ही कल्याण नक्की होते.
शिक्षकी पेशातून ज्ञानदानाचे कार्य करून आणि विद्यार्थी संस्कारक्षम घडून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम बाई मावशीने केल्यामुळे त्यांचे जीवन सुखी समृद्ध झाले आहे. शिक्षकी पेशामध्ये चांगले काम केल्यामुळें अनेक पुरस्कार मिळाले आहेत हे खऱ्या अर्थाने तिने केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती आहे. करमाळा सारख्या ग्रामीण भागातून पुणे शहरांमध्ये जाऊन शिक्षकी पेशा मध्ये नोकरी करून कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडून आपल्या नावाचा ठसा उमटवून यशस्वी मुलगी यशस्वी पत्नी यशस्वी आई यशस्वी सासू यशस्वी बहिण म्हणून उज्वला राजेंद्र नायकोडे कुटे हिने यशस्वीपणे भुमिका पार पाडली आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जसा स्त्रीचा हात असतो तसेच बाई मावशीला खंबीर साथ देणारे आमचे काका राजेंद्र नायकुडे व बहीण श्रीमती वैशाली शिनगारे म्हणजेच बेबी मावशीची चांगली साथ लाभली आहे. संसारात आलेल्या संकटाचा सुखदुःखाचा यशस्वीपणे सामना करून कुटुंबाची नौका संसार रुपी भवसागरातून पार करणाऱ्या प्रेमळ मनमिळावू कुटुंब वत्सल प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन मदत करणारी कुटुंबाबरोबर सर्वांची हित पाहणारी बाईमावशीचे कार्य नक्कीच कौतुकास्पद प्रेरणादायी आहे.
पदवीधर शिक्षिका जि. प शाळा नरे येथे अध्यापनाचे कार्य यशस्वीपणे पार पाडून उज्वला राजेंद्र नायकुडे कुटे ही रविवारी २७ जुलैला सेवानिवृत्त होत आहे.
त्यानिमित्त ब्लू वॉटर हॉटेल, औंध, रावेत बीआरटीएस रोड, पुनावळे पिंपरी- चिंचवड दुपारी साडेबारा वाजता गट विकास अधिकारी माननीय श्री सुधीर भागवत गटविकास अधिकारी दत्तात्रय भालेराव केंद्रप्रमुख सुरेश साबळे, केंद्रप्रमुख विशाल कुंभार विशेष कार्यकारी अधिकारी चौक वर्षा किरण सरोदे विशेष अधिकारी बालभारती पुणे यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात मान्यवर अधिकारी नायकुडे कुटुंब नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये सेवानिवृत्ती चा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
बाई मावशी सेवानिवृत्त होत आहे तिच्या सेवानिवृत्तीच्या नंतर सुखमय आनंददायी आरोग्य संपन्न भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.!!
शब्दांकन-
दिनेश मडके, पत्रकार
(तालुकाध्यक्ष- डिजिटल मीडिया पत्रकार करमाळा, राज्य कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र)