17/12/2024

मी पाटील गटातच, महायुतीत प्रवेश नाही ; व्हायरल झालेला फोटो जुना- कावळवाडीचे सरपंच तुषार हाके

0
IMG-20241113-WA0042.jpg

करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE)-
कावडवाडीचे सरपंच प्रतिनिधी तुषार हाके यांनी नारायण पाटील गटाला राम राम करत भाजपा प्रदेशाध्यक्ष रश्मी बागल यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश केला असल्याचे वृत्त आज मंगळवार दि. १२ रोजी सायंकाळी प्रसिद्धी माध्यमांवर व्हायरल झाले होते. मात्र हाके यांनी बागल गटात प्रवेश केल्याचा इन्कार करत दिशाभूल करून सदर प्रकार घडवून आणला असल्याचे सांगितले आहे. असून आज जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांची भेट घेऊन आपण पाटील गटातच असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर बोलताना त्यांनी सांगितले की, करमाळा येथे कामानिमित्त गेलो असता तालुक्यातील देलवडी येथील माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीसोबत असताना त्याच्यासह त्याच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी बागल गटात प्रवेश केला. यावेळी फोटो काढताना सगळ्यांसोबत अनावधानाने माझाही फोटो काढला गेला. यावेळी माझ्यासोबत माझ्या गावातील कोणीही नव्हते. मात्र महायुतीत प्रवेश केला नसल्याचा खुलासा हाके यांनी केला आहे.

आज कावळवाडी येथील आजी-माजी सरपंच, उपसरपंच यांच्यासह करमाळा येथे पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार नारायण पाटील यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही गटाशी किंवा पक्षाशी संबंधित नसल्याचा खुलासा तुषार हाके यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page