08/06/2025

वाशिंबे येथील श्री भैरवनाथ देवस्थानची यात्रा उत्साहात पार ; भाविकांची अलोट गर्दी

0
IMG-20250413-WA0015.jpg

वाशिंबे, दि. १३ (सचिन भोईटे)-

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील जागरूक देवस्थान म्हणून उजनी बॅकवॉटर परिसरातील भिमा नदीतच्या काठावरती असलेल्या वाशिंबे (ता. करमाळा) येथील ग्रामदैवत देवस्थान श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा उत्साहात पार पडली.

मानाची पालखी, कावडी नृत्य,भैरवनाथ महाराज व जोगेश्वरीच्या विवाह सोहळा. परंपरेनुसार विधीवत आदी.कार्यक्रम पार पडले. देवाचा घोड्यावरती स्वार छबिना मिरवणुकीत भाविक भक्तांची अलोट गर्दित ‘ नाथ साहेबांचं चांगभलं’ च्या जयघोषात वाशिंबे नगरीत हा यात्रा उत्सव संपन्न झाला.

रंगबेरंगी फटाक्याच्या अतिबाजीने व आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून गेला होता.मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने पंचक्रोशीतील भक्त व अनेक भागातुन भक्तगण या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात असतात.यानिम्मिताने धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन होते. भैरवनाथ मंदिर परिसरात नूतन बांधलेल्या आखाड्यात निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. यात्रा उत्सव सोहळ्याचे नियोजन भैरवनाथ मंदिर ट्रस्ट,मानकरी, ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page