उद्या जेऊर बंद.! सकल जैन समाजाचा उद्या मोर्चा


जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)-
केंद्र सरकारच्या निषेधार्त उद्या जेऊर बंद राहणार असून मोर्चा काढण्यात येणार आहे.
जैन समाजाचे झारखंड मधील गिरडी जिल्ह्यातील श्री सम्मेद शिखरजी हे देवस्थान केंद्र सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केल्यामुळे उद्या बुधवारी दुपारी वाजेपर्यंत जेऊर गाव बंद ठेवण्यात येणार असून गावातील जैन मंदिर ते पोलिस स्टेशन पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

