करमाळा न्यायालयामध्ये वृक्षारोपण संपन्न
करमाळा, दि. १२ (करमाळा-LIVE)-
करमाळा न्यायालयाच्या आवारामध्ये आज विविध झाडांचे रोपण वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीश माननीय मीना एखे मॅडम, दिवानी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शर्वरी कुलकर्णी मॅडम तसेच सहदिवाणी न्यायाधीश भार्गवी भोसले मॅडम तसेच करमाळा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दत्तात्रय सोनवणे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी वकील संघाचे जेष्ठ सदस्य बी.टी. देवी, कमलाकर वीर, योगेश शिंपी, प्रमोद जाधव, अजित विघ्ने, एम.डी. कांबळे, विनोद चौधरी, प्रियाल अगरवाल, राम नीळ, ॲड. पवार, ॲड. ईंगळे, ॲड. ढेरे, आकाश मंगवडे, ॲड. बागल, सरकारी वकील, न्यायालयीन अधीक्षक, सहा. अधिक्षक व कर्मचारी आदी उपस्थित होते.