श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ९ जुलैला करमाळा तालुक्यात येणार; तालुक्यात तीन मुक्काम घेणार पालखी
जेऊर, दि. १३ (करमाळा-LIVE)-
नाशिक येथील त्रिंबकेश्वर येथून पंढरीला निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महारांजाची पालखी मंगळवारी ९ जुलैला करमाळा तालुक्यात येणार असून तालुक्यातील पहिला मुक्काम रावगावं ९ जुलैला असेल.
यावर्षी आषाढी एकादशी गुरूवार १७ जुलैलाअसून, श्री निवृत्तीनाथ महारांजाची पालखी २० जूनला प्रस्थान होईल
करमाळा तालुक्यातील श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी वेळापत्रक-
९ जुलै- रावगावं येथे मुक्काम
१० जुलै – दुपारी करमाळा शहरात
१० जुलै- जेऊर येथे मुक्काम
११ जुलै- शेलगावं येथे दुपारी
११ जुलै – कंदर येथे मुक्काम
१२- जुलैला पंढरपूर कडे रवाना
प्रशासनातर्फे यासाठी तयारी करण्यात आलेली आहे. सुमारे पन्नास हजार वारकऱ्यांचा समावेश आहे.