08/06/2025

उदय वाघमारे याचे यश सर्वसामान्य व गरीब कुटुंबातून शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी, निरपेक्ष रुग्णसेवा हाच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचा प्रमुख उद्देश असावा; माजी आमदार नारायण पाटील

0
IMG_20221203_100154.jpg

जेऊर, दि. 3 (करमाळा-LIVE)-
निरपेक्ष रुग्णसेवा हाच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्याचा प्रमुख उद्देश असावा असे मत माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केले. जेऊर येथील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नीट या राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परिक्षेत उल्लेखनीय यश मिळवून एम.बी.बी.एस. (MBBS) च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्राप्त केल्याबद्दल उदय पांडूरंग वाघमारे याचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत, माजी आमदार नारायण पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, संचालक विलास पाथ्रुडकर, सचिव प्रा. अर्जूनराव सरक, सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक मोहोळकर सर, माजी प्राचार्य ह. सि. धालगडे, मरळ सर, प्राचार्य दहिभाते, कांबळे सर, प्राचार्य कोठावळे, सहदेव वाघमारे यांचेसह शिक्षण व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळ, ग्रामपंचायत जेऊर, माध्यमिक शिक्षक पतसंस्था करमाळा व सोलापूर आदिंसह अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाच्या वतीने उदय वाघमारे याचा सत्कार करण्यात आला.उदय वाघमारे याने नीट परिक्षेत यश मिळवल्याने त्यास आता एमबीबीएस या शिक्षणासाठी चिपळूण जि. रत्नागिरी येथील बी के एल वालावलकर कॉलेज येथे प्रवेश मिळाला आहे. त्याबद्दल कौतूक करताना माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की उदय वाघमारे याचे यश सर्वसामान्य व गरीब कुटुंबातून शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असे ठरणार आहे. वैद्यकीय शिक्षणावर खाजगी शिक्षणसंस्थाचे वर्चस्व असल्याने उच्च वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कोट्यावधी रुपये देणगी स्वरुपात मोजावे लागतात. स्पर्धा खूप असल्याने व शासकीय जागांचा कोटा ठराविक असल्याने मेरीट यादीमध्ये येण्यासाठी निरंतर अभ्यास, चिकाटी, जिद्द हे गूण अंगी असावे लागतात. उदय वाघमारे याचे यश उल्लेखनीय असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वावणारे असल्याचे पाटील यांनी सांगितले.यावेळी प्रा. धालगडे, प्रा. सरक, कांबळे सर, तळेकर आदिंनी विचार व्यक्त केले.

अंगद पठाडे यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब शिंदे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास जेऊर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महिला पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page