उंदरगावचे सरपंच युवराज मगर ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्काराने सन्मानीत

करमाळा, दि. ३० (करमाळा-LIVE)-
उंदरगावं ग्रामपंचायत चे सरपंच युवराज विक्रम मगर यांना ग्रामरत्न सरपंच पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
गावपातळीवर शासनाच्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून तसेच विकास कामे केल्याबद्दल अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून याची दखल घेऊन ग्रामरत्न सरपंच पुरस्कार दिला देण्यात आला आहे तसेच सरपंच मगर यांची सरपंच परिषदेच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सरपंच युवराज मगर यांना मिळालेल्या पुरस्कार आणि झालेल्या निवडीबद्दल त्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.