शेटफळ येथील उद्योजक वैभव पोळ ‘खासदार उद्योजक’ पुरस्काराने सन्मानीत

चिखलठाण, दि. ४ (करमाळा-LIVE)-
शेटफळ येथील उद्योजक वैभव पोळ यांचा अकलूज येथे ‘खासदार उद्योजक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात करण्यात आला आहे.
अकलूज येथे नवउद्योजक मार्गदर्शन व कार्यशाळा या कार्यक्रमात खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार उत्तम जानकर उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी, विजयसिंह मोहिते-पाटील नर्सिंग कॉलेज, रोटरी क्लब सराटी डिलाईट, लघुउद्योग महामंडळ राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ सूक्ष्म लघु व मध्यम मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास केंद्र योजनेअंतर्गत अकलूज येथे नवउद्योजक मार्गदर्शन व कार्यशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात उपस्थित शासनाच्या विविध योजना यांची माहिती देण्यात आली व मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रम झाले यावेळी जिल्ह्यातील निवडक उद्योजकांचा खासदार उद्योजकता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यामध्ये शेटफळ येथील वैभव वसंतराव पोळ यांनी जिथे चिकाटी आणि परिश्रमातून उभारलेल्या स्वतःचे ठिबक व पीव्हीसी पाईप युनिट उभा केले आहे. तालुक्यातील पहील्या शेती मॉलची उभारणी करून शेती उपयोगी सर्व साहित्य एकाच ठिकाणी शेतकऱ्यांसाठी वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. त्याबरोबरच परिसरातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. गटशेती व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून उत्पादकता वाढ व निर्याती संदर्भात काम केलेले आहे याची दखल घेऊन या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा खासदार उद्योजक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यावरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




