महिलेवर अत्याचार प्रकरणी वरकटने येथील एकास जामीन मंजूर
सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील, अॕड जयदीप देवकर करमाळा यांनी काम पाहिले.
करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)-
महिलेवर अत्याचार प्रकरणी करमाळा तालुक्यातील वरकटने येथील एकास जामीन मंजूर झाला आहे.याबाबत हकीकत अशी की, दि. 17/03/2024 रोजी वरकटणे येथील संकेत दिनकर देवकर (वय 22) याच्याविरुद्ध पीडिताने करमाळा पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 376 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
सदरच्या फिर्यादीमध्ये यातील आरोपीने पीडिताच्या पतीला व मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला भेटायला बोलावले व तिच्या इच्छेविरुद्ध तिचेवर अत्याचार केला अशा आशयाची फिर्याद दाखल झाली होती सदर प्रकरणी यातील आरोपी संकेत दिनकर देवकर यास दिनांक 19/03/2024 रोजी अटक करण्यात आली होती.
तदनंतर त्याने अॕड निखिल पाटील यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन मिळणे कामी धाव घेतली होती.
सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश श्री एल एस चव्हाण साहेब यांच्यासमोर झाली सदर अर्जाचे युक्तीवादावेळी आरोपीचे वकील अॕड निखिल पाटील यांनी त्यांचे युक्तिवादामध्ये सदरील आरोपीने पीडित महिलेस फोन केल्या बाबतचा कोणताही पुरावा रेकॉर्ड वर उपलब्ध नसून सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण होत आलेला असून आरोपीची न्यायालयीन कोठडीची कोणतीही आवश्यकता राहिलेली नाही सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी संकेत दिनकर देवकर यास जामीन मंजूर करण्यात आला.
सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील, अॕड जयदीप देवकर करमाळा यांनी काम पाहिले.