ग्रामपंचायत निवडणूक: शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची विजयी उधळण- वाशिंबे, तरटगावं मध्ये सत्तांतर
करमाळा, दि. 20 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील बहुतांश सर्वाधिक ग्रामपंचायतीत आमदार संजयमामा शिंदे यांचे विचाराचे पॅनलला भरघोस यश मिळालेले असून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
तालुक्यातील तीस पैकी वाशिंबे, पारेवाडी, सोगावं, पोमलवाडी, टाकळी, कोंढारचिंचोली, खातगावं, कात्रज, कुंभारगावं, देलवडी, रिटेवाडी, वरकटणे, कामोणे, खडकी, तरटगावं आदी ग्रामपंचायत निवडणूकीत आमदार संजयमामा शिंदे यांचे पॅनलची निर्विवाद सत्ता आलेली असून कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून विजय साजरा केला आहे.