वडगावंच्या सरपंचपदी पाटील गटाचे चंद्रकांत काळे ; निवडीबद्दल आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार

जेऊर, दि. २२ (करमाळा-LIVE)-
वडगावंचे नूतन सरपंच चंद्रकांत काळे यांचा आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वडगावं दक्षिण व उत्तर ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर आज जेऊर येथे आमदार कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.
करमाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी नूतन सरपंच चंद्रकांत रामचंद्र काळे यांचा सत्कार केला. यावेळी संचालक व माजी पंचायत समिती सदस्य ॲडव्होकेट राहुल सावंत, संचालक देवानंद बागल, माजी सभापती गहिनीनाथ ननावरे, संचालक राजाभाऊ कदम, माजी सरपंच गणेश अंधारे, माजी सदस्य सुदाम काळे पाटील गटाचे मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुनराव सरक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वडगावं दक्षिण उत्तर ग्रामपंचायतीस माझे पूर्ण सहकार्य राहणार असून या गावातील नागरिकांच्या रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी शासनाकडून विविध माध्यमातून निधी मिळवून दिला जाईल तसेच या परिसरातील मांगीतलावाचा समावेश कुकडे प्रकल्पात करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार तसेच नियोजित रीटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनीचे ओव्हर फ्लो पाणी मांगीतलावात सोडण्यासाठी ही शासनाकडे आपण आग्रही आहोत वडगाव दक्षिण उत्तर व परिसरातून विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार नारायण आबा पाटील यांनी दिले उपस्थिताचे आभार राहुल गोडगे यांनी मानले.