वांगी-1 येथे ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास’ केंद्राचे उद्घाटन
चिखलठाण, दि. 24 (करमाळा-LIVE)-
स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वांगी-1 येथे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, तसेच ग्रामीण भागातील युवक व युवतींना स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता महाराष्ट्रातील 511 ग्रामपंचायतीमध्ये “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” कार्यक्रम सुरु करण्याबाबत घोषणा केली आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील निवड करण्यात आलेल्या वांगी-1 या केंद्राचे ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन करण्यात आले. अकलूज येथील सनशाईन स्किल अकॅडमीची एजन्सी म्हणून नेमणूक झाली आहे. सदर “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” मध्ये प्रशिक्षण घेऊ इच्छूक उमेद्वारांना मोफत प्रशिक्षण देणार येणार आहे. सदर प्रशिक्षण केंद्रामध्ये 10 वी, 12 वी, पदवी, डिप्लोमा धारक यांना प्रशिक्षण मिळणार आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला संतोष देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दत्ताबापू देशमुख,किरण पाटील, साठे, ग्रामसेवक सलिम तांबोळी, तलाठी भाऊसाहेब नावाडे, भाजपचे लक्ष्मण केकान, हायस्कुल चे मुख्याध्यापक पाटील सर, सर्व शिक्षक व स्टाफ, मुख्याध्यापिका खताळ मॅडम, आयटीआय चे शिक्षक, मोठ्या संख्येने विद्यार्थी, आरोग्य सेविका,बचत गट महिला, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
दत्तात्रय देशमुख (ग्रामपंचायत सदस्य वांगी )
प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र यामध्ये पंचक्रोशीतील विद्यार्थी व युवकांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.गरजू युवकांनी याचा लाभ घ्यावा. स्वयंरोजगार उपलब्ध होणेसाठी वांगी नं १ सारख्या ग्रामीण भागात असे केंद्र सुरू केल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे आभार.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”