वांगी परिसरात अवकृपा! वादळी वाऱ्याने केळीच्या बागा भुईसपाट- लाखोंचे नुकसान
जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)-
निसर्गाने आज अवकृपा केली असून करमाळा तालुक्यातील उजनी बॕकवॉटर परिसरातील वांगी गावांना अवकाळी वादळी वाऱ्याने झोडपले आहे.
आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला अवकाळी वादळी वारा सुरू झाला. हे वादळी वारा एवढे जोरदार होते की यामध्ये केळीच्या बागा भुईसपाट झालेल्या आहेत. वांगी-2 येथील योगेश भानवसे या शेतकऱ्याची दोन एकर केळीची बाग अक्षरशः भुईसपाट झाली असून यामध्ये 10 ते 12 लाखाचे नुकसान झालेले आहे.
प्रशासनाने याचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी युवानेते विशाल तकिक-पाटील यांनी केली आहे.