वांगी-2 : जिल्हा परिषद शाळेचे तालुकास्तरीय समूह गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक

जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-
जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय लोकनृत्य आणि समूह गीत गायन स्पर्धेत वांगी नं-2 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा प्रथम क्रमांक आला आहे.
या यशाबद्दल गट शिक्षण अधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत नलावडे तसेच इतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


