वांगी-3 येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलला आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून सात लाखांचा निधी मंजूर
जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-
वांगी-3 येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलला आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून सात लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
न्यू इंग्लिश स्कूल मध्ये मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह आणि चेंजिग रूम साठी आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हा क्रीडांगण विकास योजनेच्या माध्यमातून सात लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सोमनाथ रोकडे, सरपंच मयुर रोकडे, माजी पंचायत समिती सदस्य सुहास रोकडे यांनी यासाठी प्रयत्न केले होते. तसेच आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.