वांगी-3 येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आर. ओ. फिल्टर प्रणालीचे उद्घाटन
जेऊर, दि. 2 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील वांगी-3 येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल येथे 500 लिटर क्षमतेच्या आर. ओ. फिल्टर प्रणालीचे उद्घाटन पार पडले.
पंचायत समितीचे सभापती अतुल पाटील यांच्या निधीतून पंचायत समिती यांच्या वतीने मंजूर झालेल्या 500 लिटर क्षमतेच्या आणि तीन लाख रुपये किमतीच्या आर.ओ. प्रणालीचा उद्घाटन सोहळा युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले की, शाळेतील विद्यार्थ्यांच्या शुद्ध पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे भाग्य समजतो. अशाच प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक व समाजहिताचे प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न होता आणि भविष्यात राहणार आहे.
या कार्यक्रमाच्या सुरवातीस रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अविनाश कांबळे यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी ईश्वरी विजय निंबाळकर हिची सोलापूर जिल्हा मुलींच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झालेबद्दल आणि तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक महादेव पवार यांचा विशेष सन्मान पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रशालेतील सहशिक्षक विश्वनाथ सुरवसे यांचाही त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी रामेश्वर तळेकर, सोमनाथ रोकडे, पोपट सातव, महेंद्र पाटील, सुखदेव सातव, दत्ता देशमुख, भाऊ गोडसे, गोरख सोनवणे, अशोक सोनवणे, सचिन रोकडे, नाना तकिक, हनुमंत शिंदे, शंकर तावसे, माधव नाना तकिक हे उपस्थित होते. तसेच गावातील व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक एस.डी.मोटे, ए.बी.खूपसे, व्ही. एस सुरवसे, एम. एच.देशमुख, व्ही. बी. होनपारखे, पी. व्ही. होनपारखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. आय. पवार यांनी तर आभार प्रदर्शन पी.डी.देवकर यांनी केले.