17/12/2024

वांगी-2 येथील ‘शिवमुद्रा प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी- प्रतिष्ठानच्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम

0
IMG-20230215-WA0073.jpg

जेऊर, दि. 16 (विशाल तकिक-पाटील यांच्या लेखनीतून)-
समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या पद्धतीने आजची युवक पिढी एखादा महोत्सव किंवा इतर कार्यक्रम आपापल्या पद्धतीने राबवले जातात हे आपण पाहतो, परंतु करमाळा तालुक्यातील वांगी-2 या उजनी पट्ट्यातील गावातील युवकांनी एकत्रितपणे येऊन ‘शिवमुद्रा प्रतिष्ठान’ ची स्थापना केली आहे.

या प्रतिष्ठानला जवळजवळ अकरा वर्ष पूर्ण झालेले असून एकत्रितपणे आलेल्या युवकांनी संघटना वाढविणे मागचा उद्देश हा राजकारण नसून समाजामध्ये समाजकारण किंवा वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी आहे.

छत्रपती शिवरायांनी जो आपणाला मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावरती चालण्यासाठी, समाज प्रबोधन किंवा त्या पद्धतीचे कार्यक्रम प्रत्येक वर्षी शिवजयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम या प्रतिष्ठानच्या वतीने राबवले जातात. यामध्ये सामाजिक उपक्रम भरपूर राबवलेले आहेत त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी किंवा शिक्षणाची गोडी लागण्यासाठी किंवा त्यांना शिक्षणाची गती मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे देखील आयोजन करून नंबर येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण देखील केलेले आहेत.

त्याचबरोबर या अगोदर सुप्रसिद्ध कवी केशव सुमन यांचा कार्यक्रम घेण्यात आला होता, सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई रामतीर्थकर यांचा कार्यक्रम देखील खूप चांगला झाला होता. वांगी 2 मधील ग्रामस्थ आणि माता-बहिणीने तसेच बालमित्रांनी सर्वांनी याचा खूप आनंद घेतला होता. त्याचबरोबर अनाथांची माय म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकळ यांचा देखील वांगी दोन मध्ये या शिवमुद्रा प्रतिष्ठान मार्फत एक उत्कृष्ट कार्यक्रम झाला होता तसेच कीर्तनातून देखील समाज प्रबोधन करण्यासाठी हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा देखील कार्यक्रम वांगी दोन मध्ये पार पडला, वेगवेगळे व्याख्यानकार आतापर्यंत वांगी-2 मध्ये येऊन गेलेले आहेत.

शिवमुद्रा प्रतिष्ठान मार्फत सामाजिक उपक्रमांमध्ये वृक्षारोपण त्याचबरोबर वांगी 2 मधील गरजूंना शौचालय वाटप देखील करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या साह्याने भगवा ध्वज कट्टा, त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील बाहेरील सभागृहात शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. या शिवमुद्रा प्रतिष्ठानचे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत जेवढे कार्यक्रम करण्यात आले त्यामध्ये कोणीही क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केलेला नाही, आणि निस्वार्थपणे काम करणारी अशी ही संघटना खरोखरच समाजामध्ये असणे खूप गरजेचे आहे आणि वांगी दोन मध्ये ही संघटना आहे याचा आम्हा वांगी 2 ग्रामस्थांना खूप अभिमान आहे. तसेच या युवकांबरोबर वांगी 2 मधील ग्रामस्थांचे देखील मोलाचे सहकार्य हे कायम असते कारण ग्रामस्थांचा सपोर्ट असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि ही संघटना अशीच ग्रामस्थांच्या सहकार्यातून पुढे कायम निरंतर काम करत राहणार आहे.

यावर्षी 2023 सार्वजनिक शिवजन्मोत्सव कार्यक्रम पुढील प्रमाणे-
1) 19 फेब्रुवारी 2023- व्याख्यान
सकाळी नऊ वाजता, शिवव्याख्याते पल्लवीताई हाके

2) 20 फेब्रुवारी 2023- शिव कीर्तन, रात्री 8 ते 10 हभप गजानन महाराज वाव्हळ (राष्ट्रीय कीर्तनकार पुणे)

3) 21 फेब्रुवारी 2023- मिरवणूक-सायंकाळी 6 ते 10 (जय भगवंत ढोल ताशा पथक बार्शी)

स्थळ-छत्रपती शिवाजी महाराज चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर वांगी-2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page