08/06/2025

जागतिक एड्स दिन : एड्स जाणा; एड्स टाळा

0
20201201_141100-1.jpg

जेऊर, दि.1 (करमाळा-LIVE)-
1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो.सध्या एड्स ची वाढती संख्या ही एक जागतिक पातळीवर समस्या बनलेली असून सध्यातरी एड्स जाणा आणि एड्स टाळा हे खूप महत्त्वाचे आहे.खरंतर एड्स हा एक रोग नसून एक शारीरिक स्थिती बनलेली आहे.

एड्स म्हणजे “अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम” होय. एच.आय.व्ही. विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग म्हणजे एड्स होय. एड्स मुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे नाहीशी होते.एड्‌स झालेल्या माणसाला इतर कुठल्याही प्रकारची संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. एच.आय.व्ही. रक्तातील रोगप्रतिकारक पेशीं लिम्फोसाईट्सवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी, खोकल्यासारखे साधे तसेच क्षयासारखे भयंकर रोग होतात. त्यावर इलाज करणे अवघड होते.
खरंतर एच.आय.व्ही एड्स हा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे तसेच दूषित रक्त संक्रमण केल्याने आणि एखाद्या एच.आय.व्ही ग्रस्त मातेकडून गर्भाला किंवा स्तनपान करणाऱ्या बाळाला संक्रमण, याप्रकारच्या गोष्टींतून एचआयव्ही विषाणूंचा प्रसार आणि एड्सची लागण होते.

बरेच वेळा एच.आय.व्ही चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये दीर्घ काळापर्यंत कोणतीच लक्षणे दिसत नाहीत.तसेच काही वेळा एच.आय.व्ही. चे विषाणू देखील वैद्यकीय चाचणीत दिसून येत नाहीत.त्यामुळे एड्स ची लागण झाली का नाही ते लवकर निदान होत नाही.

1986 साली पहिला एड्स रूग्ण-
भारतातल्या पहिल्या एड्सच्या रुग्णाचं निदान 1986 साली चेन्नई येथे झाले. चेन्नई मधील वेश्यावस्तीत पहिला रूग्ण सापडला.

एड्स संख्येते भारत तिसरा-
एड्सच्या रुग्णसंख्या वाढताना दिसत असून जगात भारताचा तिसरा क्रमांक लागतो.आणि आशिया खंडात दुसरा क्रमांक लागतो.ही एक चिंतेची बाब आहे.

रोगप्रतिकार शक्ती तपासा-
खरंतर कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीची रोगप्रतिबंधक शक्ती त्याच्या सीडीफोर (CD4) लिम्फोसाइट या रक्तपेशीच्या संख्येवरून मोजली जाते. एचआयव्हीचा विषाणू या ‘सीडीफोर लिम्फोसाइट’ वरच हल्ला करत असल्यानं रुग्णाची प्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे त्या रुग्णाला इतर कुठलाही जंतुसंसर्ग रोग होतो जंतू.

एड्स ची प्राथमिक लक्षणे
सतत ताप येणे तसेच डोकेदुखी दैनंदिन जीवनात जास्त प्रमाणात थकवा जाणवणे. तसेच कॉलरा सारखा आजार किंवा मळमळ होणे. माणसाच्या नसांमध्ये सूज येणे हीच सर्व प्राथमिक लक्षणे असून त्यासाठी वैद्यकीय चाचाणीतूनच हे निदान होऊ शकते.

एड्स ची मुख्य लक्षणे-
1) अचानक मोठ्या प्रमाणावर वजन घटने
2) सतत कोरडा खोकला येणे
3) सतत ताप येणे
4) रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात घाम येणे.
5) माणसाच्या जांघ, काख किंवा मानेतील नसा सुजने
6) जास्त कालावधीसाठी अतिसार किंवा कॉलरा होणे.
7) फुफ्फुसांची जळजळ होणे. त्वचेच्या खाली किंवा नाकामध्ये लालसर,तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे डाग होणे.

एडस् टाळण्यासाठी एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळा-
जर लैंगिक संबंधातली व्यक्ती एड्सग्रस्त असेल तर संबंधात वेळोवेळी निरोध वापरावा. एखादा संसर्गजन्य रोग असेल तर इंजेक्शनांसाठी वापरण्यात येणा-या सुया व सिरींज पॅकबंद असव्यात. एकदा वापरानंतर त्या परत वापरू नये.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page