07/06/2025

निसर्गाप्रती संवेदनशीलता वाढवण्यासाठी यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशनद्वारे व्यापक जाणिव जागृतीपर उपक्रम राबवणार- प्रा. गणेश करे-पाटील

0
IMG-20250204-WA0022.jpg

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-
निसर्ग संतुलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पक्ष्यांचे व वन्यजीवांचे अधिवास जपायला हवेत तसेच निसर्गाप्रति संवेदनशिलता वाढवण्यासाठी यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशनद्वारे व्यापक जाणिव जागृतीपर उपक्रम राबवणार असल्याचे मत प्रा. गणेश करे- पाटील यांनी व्यक्त केले आहे.

जागतिक पाणथळ दिनानिमित्त यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशन अभ्यासगटाने नुकतेच ताडोबा येथे पक्षीनिरीक्षण व जैवविविधता संवर्धन मोहीम राबवली व चंद्रपूरातील ताडोबा पाणथळ परिसरात पक्षी,फुलपाखरांसह वन्य जिवांचीही निरीक्षणे नोंदविली.

भविष्यासाठी पाणथळ संवर्धन या २०२५ च्या संकल्पनेनुसार जागतिक पाणथळ दिवस साजरा करण्यात आला. यशकल्याणी संस्थेच्या सहकार्याने संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली या पक्षीनिरीक्षण व जैवविविधता अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पाणथळ अधिवासांचे महत्व, त्यांची उपयोगिता याबाबत व्यापक स्तरावर जाणिव जागृती होऊन पाणथळींचे संवर्धन होण्यासाठी दरवर्षी जगभरात विविध उपक्रम राबवले जातात. यशकल्याणी संस्थेच्या माध्यमातून आम्ही निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबवणार असल्याचे करमाळा लाइवशी संवाद साधताना करे पाटील यांनी सांगितले.

२ फेब्रुवारीला झालेल्या पाणथळ दिवस या उपक्रमाचे औचित्य साधत यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशनच्या अभ्यासगटाने चंद्रपुरातील ताडोबा परिसरातील ईराई तलाव परिसरात पॅच बर्डींग नुसार पक्षीनिरीक्षण केले. तेथील फुलपाखरू उद्यान, सायन्स पार्कसह जैवविविधता मंडळ संग्रहालयास भेट देऊन माहिती घेतली.

ताडोबा परिसरात यांचा वावर दिसून आला.
सीगल, रेड नेपड आयबीस, शॉवलर डक, ओपन बील स्टॉर्क ,रीव्हर टर्न, स्टील्ट, ग्रे हेरॉन, कॉमन कूट, व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, पर्पल स्वाम्प हेन,आस्प्रे, ट्रीपाय, हनी बझार्ड, जंगल बॅबलर, रेड स्टार्ट, अदिसह १५ प्रकारच्या ६७ पक्ष्यांची व पाणथळी व ग्रास लँड वर अवलंबून असणारे, स्पॉटेड डियर, अँटेलोप, बार्कींग डियर, जंगल बोअर, पट्टेरी वाघ आदि वन्यजीवांचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

अभ्यास गटातील सहभागी सदस्य
प्रा. गणेरा करे-पाटील, प्रा.बाळकृष्ण लावंड, प्रा जयेश पवार, प्रा.विष्णू शिंदे, अतुल दाभाडे बर्डमॅन ऑफ ताडोबा सुमेथ वाघमारे आणि पक्षीनिरीक्षक कल्याणराव साळुंके हे सहभागी झाले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page