08/06/2025

गावखेड्यात युवासेना वाढवा, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवा – उत्तम आयवळे यांचे आवाहन

0
IMG_20231230_153745.jpg

करमाळा, दि. 30 (करमाळा-LIVE)-
गावखेड्यात जाऊन युवासेना भक्कम करून सर्वसामान्य शेतकरी, युवक, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना विस्तारक उत्तम आयवळे यांनी केले.

श्री आयवळे करमाळा येथील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक बांधणी बैठकीत बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल, माजी शिवसेना तालुकाप्रमुख शाहुदादा फरतडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, तालुका समन्वयक कुमार माने, शहरप्रमुख समीर हलवाई शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव उपस्थित होते.

युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा येथील शासकीय विश्रामगृहात युवासेनेची संघटनात्मक आढावा बैठक पार पडली या वेळी वर्षभरात युवासेनेकडून केलेली आंदोलने मोर्चे यांची माहिती देण्यात आली तसेच ग्रामीण भागातील युवकांच्या उपतालुकाप्रमुख, तालुका चिटणीस, विभाग प्रमुख, गट प्रमुख पदावर निवडी करण्यात आल्या.

तालुका चिटणीसपदी पाडळी येथील पांडुरंग शिंगटे, कोर्टी गट उपतालुकाप्रमुख पदी दिवेगव्हाण येथील अभिषेक मोरे, वांगी जिल्हा परिषद गट उपतालुकाप्रमुख पदी वांगी येथील रामेश्वर पांढरमिसे, केम जिल्हा परिषद गटाच्या उपतालुकाप्रमुख पदी साडे येथील माऊली फरतडे, पांडे जिल्हापरिषद गट उपतालुकाप्रमुख पदी पाडळी येथील पांडुरंग ढाणे, वीट जिल्हापरिषद उपतालुकाप्रमुख पदी गुळसडी येथील समाधान यादव यांची नियुक्ती करण्यात आली. कोर्टी विभाग प्रमुख पदी पारेवडी येथील विशाल काळे, वीट विभाग प्रमुख पदी वीट येथील इश्वर जाधव, वांगी विभाग प्रमुख पदी शेटफळ येथील सोमनाथ पोळ, पांडे विभाग प्रमुख पदी तरटगावं येथील आनंद घाडगे यांच्या निवडी करण्यात आल्या. तसेच वांगी गटप्रमुख पदी सोगाव येथील मयुर तावरे, कुंभेज गटप्रमुख पदी सरपडोह येथील हणुमंत रंदवे, रावगावं गटप्रमुख पदी वडगावं येथील बालाजी वाडेकर, पांडे गटप्रमुख पदी करंजे येथील आकाश सरडे, यांची नियुक्ती करण्यात आली. युवासेना विस्तारक उत्तम आयवळे, जिल्हाप्रमुख सचिन बागल माजी तालुकाप्रमुख शाहुदादा फरतडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सदर निवडी पार पडल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page