08/06/2025

माढ्यातील ३६ गावे ठरणार गेमचेंजर! करमाळा विधानसभेसाठी ६७.८५ टक्के मतदान ; तिन्हीही उमेदवारांचा विजयाचा दावा

0
IMG-20241121-WA0003.jpg

जेऊर, दि. २१ (गौरव मोरे)-
करमाळा विधानसभेसाठी आज टक्के मतदान झालेले असून मतदारसंघातील माढा तालुक्यातील ३६ गावे गेमचेंजर राहणार असून मागील निवडणुकीत विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांना ३६ गावातील मताधिक्यामुळे विजय मिळवता आला होता. यावेळी मागच्या निवडणुकीच्या तुलनेत टक्केवारी घसरली जरी असली तरी मतदान वाढल्यामुळे मतदान संख्या वाढलेली आहे. २०२४ विधानसभेला ६७.८५% इतके मतदान झालेले आहे. माढा तालुक्यातील ३६ गावात देखील ६७% मतदान झालेले आहे. ३६ गावात एकूण १ लाख ७२४ पैकी ६७ हजार १६० इतके मतदान झालेले आहे.

करमाळा मतदारसंघातील एकूण ३२८९९४ मतदारांपैकी २२३२०७ म्हणजेच ६७.८५ टक्के एवढे मतदान झालेले आहे. मागील तीन निवडणुकांपेक्षा यावेळी टक्केवारी कमी झालेली असली तरी मतदान मात्र वाढलेले आहे. २००९ ला ६६.५७ टक्के, २०१४ ला ७२.७३ टक्के, २०१९ ला ७१.०५ टक्के मतदान झालेले होते.

३६ गावात झालेले मतदान पुढीलप्रमाणे-

करमाळा मतदारसंघात पुरूष १७१५१५ पैकी ११९५८३ तर महिला १५७४६८ पैकी १०३६२१ आणि इतर तीन असे ३२८९९४ पैकी २२३२०७ असे एकूण ६७.८५% मतदान झालेले आहे.

यावेळी पारंपरिक पाटील-शिंदे-बागल गटांमध्ये तिरंगी लढत होत असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नारायण पाटील, शिवसेना शिंदे गटाकडून दिग्विजय बागल, अपक्ष आमदार संजयमामा शिंदे अशी तिरंगी लढत होत आहे. तिन्हीही उमेदवारांनी विजयाचा दावा केलेला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page