कुंभेजच्या बागल विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी ; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप
करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)-
दिगंबरराव बागल विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक हनुमंत पाटील यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. हनुमंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार अंगीकारल्यास विद्यार्थी ज्ञानसमृद्ध व गुणसंपन्न होऊ शकतात.” त्यांनी बाबासाहेबांच्या अभ्यासू वृत्तीचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी आपल्या भाषणात आधुनिक काळातील विविध आव्हानांचा सामना करन्याविषयी भाष्य केले.
विद्यालयातील शिक्षक कल्याणराव साळुंके सर
सीताराम बनसोडे, संतोष शिंदे व विष्णू पोळ यांनीही मनोगत व्यक्त करत डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा आढावा घेतला.
जयंतीचे औचित्य साधत शिक्षक कल्याणराव साळुंके सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासू वृत्तीचे व भविष्याचा वेध घेत त्यांच्या विचारांचे अनुकरण करून विद्यार्थ्यांनी आदर्श विद्यार्थी बनावे, असे आवाहन केले.
यावेळी साळुंके सर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट दिली. मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या छोट्याशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
——————————————-
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन सीताराम बनसोडे यांनी केले. शेवटी कल्याणराव साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास दादा जाधव , किशोर कदम, बलभीम वाघमारे , संतोष घोरपडे, नंदू कांबळे यांनी परिश्रम घेतले. या वेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







