जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलचे अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत यश ; सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

जेऊर, दि. २५ (करमाळा-LIVE)-
मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूलची कुमारी सभ्यवी नवनाथ शेंडगे इयत्ता तिसरी हिने ३०० पैकी २९४ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे तर रुद्रांश सूर्यकांत पाटील इयत्ता दुसरी याने १०० पैकी ८८ गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवला. तसेच शुभम संतोष नलवडे इयत्ता दुसरी याने १०० पैकी ८४ गुण मिळवून जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळाला आहे.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, सचिव प्रा.अर्जून सरक, प्राचार्य आबासाहेब सरवदे, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, उपप्राचार्य एन.डी.कांबळे, पर्यवेक्षक बी.एस.शिंदे, विभाग प्रमुख नितीन पाटील व सर्व शिक्षकांनी केले आहे.