कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)-
कामगार नेते, संस्थापक हमाल पंचायत करमाळा, माजी संचालक आदिनाथ सहकारी साखर कारखाना, माजी सदस्य जिल्हा परिषद सोलापूर स्व. सुभाष आण्णा सावंत यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त किर्तन सेवे सह रक्तदान शिबिर अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड राहुल सावंत यांनी दिली आहे.
सदर कार्यक्रमांमध्ये शुक्रवारी १४ आॕगस्टला रोजी सकाळी १० ते दु. १२ या वेळेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधन बाल कीर्तनकार छोटे इंदुरीकर ह.भ.प. माऊली काकडे महाराज यांचे हरीकीर्तन होईल आणि दुपारी १२ वाजता स्व. सुभाष ( आण्णा ) सावंत यांचे प्रतिमेस पुष्पवृष्टी करून आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तसेच सकाळी ९ ते ४ यावेळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्या आले आहे. प्रत्येक रक्तदात्याला भेट स्वरूपात पाण्याचा जाआर देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक करमाळा तालुका हमाल पंचायत, करमाळा छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम सावंत गल्ली, मारुती मंदिर जवळ, करमाळा येथे होणार आहे.
